top of page

श्री गणेश मंदिर कुंभारवाडा शिरोली बु॥

Shri Ganesh Mandir Shiroli BK

| वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
|| निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

गणेश मंदिराची परिसर माहिती: 

गणेश मंदिराची स्थापना सन १९२० च्या पूर्वी झाली आहे. जुन्या गणेश मंदिराचे बांधकाम हे अंदाजे १६'×२६' जागेमध्ये झाले होते. पण मंदिराचा एकूण परिसर अंदाजे ८६'×२६' जागेचा आहे. शिरोली बुद्रुक गावातील कुंभार बांधवानी मिळून त्यावेळी मंदिरांची उभारणी केली होती. मंदिर हे कौलारू आणि चुना, विटांमध्ये बांधकाम केले होते. भिंती ह्या १८-२० इंच रुंदीच्या होत्या. चांगल्या लाकडांचा वापर करून बांधकाम योग्य प्रकारे केले गेले होते. कालांतराने मंदिरांची गरजेनुसार डागडुजी करण्यात आली. त्यावेळी गणेश मंदिरात स्थापन केलेली मूर्ती ही पाषाणामध्ये कोरली होती. अंदाजे १३८ किलो वजनाची मूर्ती आकर्षक होती. दरवर्षी गणेश उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.

गणेश मंदिराच्या परिसराच्या प्रथम भागामध्ये श्री गणेश मंदिर आहे. शेजारच्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा विराजमान आहे. मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुद्धा चालू असते. सविस्तर माहिती माहिती वाचण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यांमध्ये मेनू बटण वर क्लिक करा किंवा खाली दिल्येला बटण वर क्लिक करा. मंदिराच्या परिसराच्या मागील बाजूस संत शिरोमणी गोरोबाकाका - श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर आहे. श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सन ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आला. संत गोरोबाकाका मंदिराची गाभाऱ्यातील राहिलेली कामेही त्याच कालावधीत करण्यात आली. जीर्णोद्धाराची सविस्तर माहिती वाचण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यांमध्ये मेनू बटणवर क्लिक करा किंवा खाली दिल्येला बटणावर क्लिक करा.

नूतनीकरण केलेल्या गणेश मंदिराचे बांधकाम अंदाजे ३३'×२६' जागेमध्ये केले आहे. मंदिरात प्रवेश करताना अंदाजे ३'.५'' लांबीचा चबुतरा आहे. मंदिरामध्ये मूर्तीसाठी सिमेंटकाँक्रीट मध्ये चौथरा बनवलेला असून मूर्तीभोवतीची आरास आणि कळस संगमरवर मध्ये बनवलेला आहे. नवीन गणेश मूर्ती १०८ किलो वजनाच्या बेसाल्ट काळा पाषाणामध्ये कोरली असून उंची २५ इंच आहे. जूनी आणि नवीन मूर्ती एकसारखी असावी म्हणून अगदी हुबेहूब जुन्या मूर्तीसारखी दिसणारी नवीन मूर्ती घडवण्याची कला शिल्पकार दिलीप वाघचौरे(संगमनेर) ह्यांनी साध्य करून दाखवली आहे. श्री गणेश, संत शिरोमणी गोरोबाकाका- श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा-कलशारोहण सोहळा हा मि. माघ शुक्ल प्रतिपदा शके १९४३ गुरुवार दि. ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न झाला. तीन दिवस झालेल्या ह्या सोहळाची सविस्तर माहिती माहिती वाचण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यांमध्ये मेनू बटण वर क्लिक करा किंवा खाली दिल्येला बटण वर क्लिक करा.

bottom of page