श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||

 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||धृ||


रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ जय देव०|| 2 ||

लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना॥जय देव०|| ३||

---------------------------

श्री विठ्ठल आरती  

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा |
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा || १ ||

 

जय देव जय देव जय पांडुरंगा |
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||धृ||

 

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥ जय देव०॥२॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥ जय देव०॥३॥

ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय देव०॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ जय देव०॥५॥

----------------------------

श्री शंकराची आरती  

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

 

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

 

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

 

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

 

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव० ॥ ४ ॥

-------------------------

संत गोरा कुंभार आरती

सत्तावीस युगे सत्यपूर नगरी ।
न वर्णवे त्या हरी हरा थोरी ।
अखंड ध्यातो पूजा विस्तारी ।
शुक सनकादीक जय जय हाकारी ।। १ ।।


जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।। धृ ।।

 

धन्य कवित्व अनुपम्य केले 1
ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ।
पाहता पाऊल विश्व मावळले ।
अनुभव घेता सद्गुरू भेटले ।। २।।

 

दूरपण उघडे तुजपाशी केले ।
अनुभव घेता तापसी झाले ।
म्हणुनी नामा ओवाळी भावे ।
त्यापाशी देव कैवल्य साचे ।।।।

----------------------

मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

हे नक्की वाचा