जीर्णोद्धारा ची माहिती
श्री गणेश मंदिर -
सन मार्च २०२० मध्ये कोरोना या महामारी मुळे संपूर्ण देशा मध्ये लॉकडाऊन झाला. ह्या कारणाने शहरामध्ये कामानिमित्त असणारी पण ज्यांची गावाला नाळ जोडलेली आहे असे काही कुंभार बांधव गावाला आले. रोज रोज मंदिरांची झालेली जीर्ण अवस्था पाहुन सर्वच कुंभार बांधवाना खंत वाटत होती. ज्येष्ठ लोकांचे भरपूर वर्षापासून स्वप्न होते की बप्पाचा जीर्णोद्धार आणि प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार असावे. ५-६ महिन्यांनंतर म्हणजे २०२० सप्टेंबर महिन्यात दिगंबर अप्पा आणि भालचंद्र नाना यांनी मंदिराची डागडुजी किंवा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. बिल्डर प्रदिपशेठ थोरवे यांच्याकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा खर्चाचा अंदाज घेण्यात आला आणि स्थानिक बांधवांबरोबर ऑक्टोबर २०२० मध्ये बैठक घेवून प्रस्ताव मांडला. उपस्थित स्थानिक आणि बाहेरगावी कामानिमित्त स्थायिक झालेले काही कुंभार बांधव यांच्या संमतीने ताबड़तोब काही निर्णय घेण्यात आले. कोन किती देणगी देवू शकते असा अंदाज घेण्यात आला. जीर्णोद्धाराच्या कामासाठी लागणारा ५०% निधी जमा होण्याची शाश्वता मिळाली. अनुपस्थितित प्रतिनिधी बांधवाना फोनवरुंन सर्व माहिती सांगून समंती घेण्यात आली आणि झालेल्या निर्णयावर लेखी ठराव करण्यात आला आणि जीर्णोद्धाराचे काम खालीलप्रमाणे चालू करण्यात आले. कुंभारवाड्यातील, स्थानिक आणि बाहेरगावी कामानिमित्त स्थायिक असणारे कुंभार बांधवांकडून देणगी रूपात आर्थिक सहाय्य मिळाले. काही इच्छुक ग्रामस्थांनी देखील देणगी रूपात मदत केली. ठरल्याप्रमाणे सन २०२० पासून श्री दिगंबर विष्णू उकिर्डे आणि श्री भालचंद्र नारायण उकिर्डे ह्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार साठी प्रमुख कार्यवाहक म्हणून आणि श्री सदानंद मारुती उकिर्डे, श्री गणेश मारुती उकिर्डे, श्री वैभव सुरेश सोमवंशी ह्यांनी सहाय्यक कार्यवाहक म्हणून सर्वोतपरी जबाबदारी पार पाडली आणि ह्यापुढे हि त्याच जोमाने पुढील कामे करत आहे . श्री उल्हास गोविंद उकिर्डे, श्री गोरखनाथ गणपत उकिर्डे, श्री राजु गंगाराम उकिर्डे, सागर दिगंबर उकिर्डे सुद्धा ह्या कामासाठी सहकार्य करत आहे. श्री वसंतराव विष्णू उकिर्डे आणि रामचंद्र गणपत उकिर्डे ह्यांचा वेळोवेळी सल्ला मिळत आहे. कुंभारवाड्यामध्ये असणाऱ्या महिलांकडून देखील विशेष सहकार्य मिळत आहे.
अशा प्रकारे मंदिराच्या जीर्णोद्धाराची पहिल्या टप्प्यातील महत्वाची कामे जानेवारी २०२२ पर्यंत करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील जमा खर्चाचा अहवाल मूर्ती स्थापनेच्या सोहळ्या नंतर ५-६ दिवसात म्हणजे दि. ११/०२/२०२२ या तारखेला स्थानिक कुंभार बांधवांसमोर सादर केला आणि सर्वांनी तो मान्य केला.
२७ ऑक्टोबर २०२०-
श्री गणेश मूर्तिमधुन देवत्व (प्राण) काढून घेण्याचा कार्यक्रम-



२९ ऑक्टोबर २०२०-
मंदिराच्या सपाटिकरनाचे काम चालू-



फेब्रूवारी २०२१-
विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन मा.श्री सत्यशीलशेठ शेरकर, ग्रामस्थ आणि स्थानिक कुंभार बांधव यांच्या उपस्थितित भूमिपूजन




पायाभरनी आणि वीट रचन्याचा कार्यक्रम-






संत गोरोबा काका मंदिर :
डिसेंबर २०२१ मध्ये गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारा बरोबर ह्या मंदिराच्या दरवाजाचे आणि गाभाऱ्यातील आतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली.
जीर्णोद्धाराचा दुसरा टप्पा:
दुसऱ्या टप्प्यातील प्रामुख्याने खालील कामे लवकरच चालू होणार आहेत
-
श्री गणेश मंदिराच्या परिसराचे कंपाउंड वॉल (आवार) चे काम
-
श्री गणेश मंदिराचे योग्य वेळेत आतून बाहेरून कलर काम
-
श्री गणेश मंदिर: मूर्ती समोर रेलिंग
-
इतर छोटी मोठी कामे (उदा. कपाटाला दरवाजा बसवणे, इत्यादी)
श्री गणेश मंदिराला (शिरोली बुद्रुक) देणगी देण्याचे चेक आणि डिमांड ड्राफ्ट, कॅश आणि इंटरनेट बँकिंग (नेट बँकिंग) पर्याय आहेत.
अधिक माहितीसाठी श्री भालचंद्र उकिर्डे, श्री दिगंबर उकिर्डे, श्री सदानंद उकिर्डे ह्यांच्याशी संपर्क करावा.