स्वामी समर्थ सेवा
सन २००५ साली श्री तुकाराम महाराज दुराफे (स्वामी समर्थ मंदिर, कुसूर) ह्यांच्या मार्गदर्शनखाली दिगंबर (अप्पा) उकिर्डे आणि परिवार यांनी आपल्या गणेश मंदिराच्या शेजारी असलेल्या त्यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ यांची नित्यसेवा चालू केली होती. काही महिन्यात कुंभारवाडयातुन लोंकाचा सहभाग मिळायला लागला आणि गणेश उकिर्डे आणि परिवार, कै. सुरेश सोमवंशी आणि परिवार आणि वाड्यातील त्यावेळी शाळा-कॉलेज मध्ये शिकनारी मुले मुली आवर्जून स्वामीच्या दर्शनाला यायचे.
सन २०१० साली स्वामी नित्यदर्शन चालू राहावे म्हणून गणेश मंदिरामध्ये स्वामींची प्रतिमा स्थलांतरित करण्यात आली. आणि त्यानंतर ही नित्य सेवा श्री गणेश उकिर्डे, अर्चना सुरेश सोमवंशी आणि स्वामी भक्तानी पुढे रुजू ठेवली आहे. सन २०१५ पासून दिंगबर अप्पाच्या प्रयत्नाने स्वामी समर्थ पालखी मार्ग क्रमणामध्ये श्री गणेश मंदिर शिरोली बु!! चा समावेश करण्यात आला. तेंव्हा पासून दरवर्षी फेब्रूवारी महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर, कुसूर येथून निघणारी पालखी श्री स्वामी समर्थ मठ जुन्नर-अमरापुर, श्री गणेश मंदिर शिरोली बु!!, श्री स्वामी समर्थ मंदिर ओझर, श्री स्वामी समर्थ मठ आळेफाटा असे मार्गस्थ होत असते.
मंदिरामध्ये येणाऱ्या ह्या पालखी कार्यक्रमाची जबाबदारी दिगंबर अप्पा, अर्चना ताई, गणेश सर आणि कुंभार वाड़ा, शिरोली बु !! गाव आणि गांवशेता मधील सर्व स्वामीसेवक पार पाडतात. सुरुवातीच्या काही वर्षे ह्या कार्यक्रमासाठी आणि नित्यसेवेसाठी येणारा खर्च आणि नियोज़न हे स्वत्रंतपणे वैयक्तिक पातळीवर केले जात होते. नंतर सर्व स्वामी सेवेकरी ह्यांनी स्वत्रंतपणे वर्गणी जमा करून नियोजन केले जाऊ लागले.
सन २०२२ पासून मंदिरामध्ये आठवडयातून फक्त गुरुवारी आणि रविवारी स्वामी सेवा करण्याचे ठरविण्यात आले आहे. वेळोवेळी रुद्रा अभिषेक, लक्षचंडी हवन, पारायण, हितगुज सारखे कार्यक्रम केले जातात. खासकरुंन महिलां उत्साहाने यात सहभागी होतात.
श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा










